पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्या पूर्व नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या फलकावर काही अज्ञात व्यक्तींनी काळे फासल्याच्या निषेधार्थ आज दिनांक एक सप्टेंबरला दुपारी बारा वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेतली आणि नागपूर शहराच्या रस्त्यांवर निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत घोषणाबाजी केली