गणेशोत्सव आणि मुस्लिम धर्मातील पवित्र ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कराड शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता सशस्त्र संचलन करण्यात आले. त्यानंतर रंगीत तालीम करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी स्वतः या संचालनात सहभागी झाले होते. कराड शहर हे पोलीस दलाच्या रेकॉर्डवर संवेदनशील शहर म्हणून नोंदले गेले आहे. गणेशोत्सव काळात कराड शहरात मोठी धामधूम असते, त्याचबरोबर मुस्लिम समाजाचा ईद-ए-मिलाद सण ऐन गणेशोत्सवात आल्याने पोलीस दलाने सशस्त्र संचलन केले.