बीड शहरातील बशीर गंज परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील तहरी बिर्याणी हाऊस या हॉटेलमध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते. आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाला तात्काळ कळविण्यात आले. पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.