भंडारा शहरातील सिंधी कॉलनी शीतला माता मंदिर जवळ मेंढा येथील जसवंता राऊत वय 60 वर्षे ही दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान सिंधी कॉलनी सितला माता मंदिर जवळ मेंढा येथे हजर असताना त्यांचा नातेवाईक आरोपी गब्बर यशवंत शहारे वय अंदाजे 40 वर्षे याने तू माझ्या बापाच्या घरी कशाला राहते असे बोलून जसवंत राऊत यांच्याशी भांडण करून शिवीगाळ केली व त्यावर जसवंता हिने हा माझा घर आहे अशी बोलली असता आरोपीने हातातील काठीने डोक्यावर व हातावर मारहाण करून डोके फोडून जखमी केले.