श्री गणेश विसर्जन व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दोघेही सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पाचोरा शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी नागरिकांना आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता याबाबतची अधिकची माहिती देऊन शांततेचे आवाहन केले असून, कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव मिळणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.