जुलै महिन्यामध्ये एका महिलेने उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. तिचे फेसबुक अकाउंट हँग करून तिला अश्लील व्हिडिओ पाठवले जात होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फेसबुक,युट्युब आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचे लोकेशन ट्रेस करून त्याला जळगाव येथून आता घेतले आहे. इतर महिलांसोबत देखील असे प्रकार होत असतील तर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांनी केले आहे.