दुपारच्या सुमारास कळवा नाका येथे रस्त्यामध्ये अचानक एक बस बंद पडल्याची घटना घडली. रस्त्याच्या मधोमध बस बंद पडल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर वाहतूक पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्ष घटनास्थळी दाखल झाले आणि बस रस्त्याच्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. मात्र रस्त्याच्या मधोमध अचानक बस बंद पडल्यामुळे एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.