आज रायगड जिल्ह्यामध्ये घरोघरी गणरायांचे आगमन झाले उत्साह, आनंद आणि भक्तीभावाने पाच दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचे आगमन झाले. पारंपरिक खालू बाजाच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया" या दुमदुमणाऱ्या जयघोषात लाडक्या गणरायाचे दुपारी तीन वाजेपर्यंत स्वागत करण्यात येत होते.गावोगावी ढोल–ताशांच्या निनादाने आणि मंगलमय वातावरणाने भक्तीचा सोहळा खुलला. घराघरांत बाप्पाचे आगमन होताच आनंदाचे वातावरण पसरले. महिलांनी पारंपरिक आरत्या गाऊन स्वागत केले तर लहान मुले फटाक्यांच्या आतषबाजीत रमली.