नांदेड मधील शेती पिकाची नुकसानग्रस्त भागाची आमदार बालाजी कल्याणकर यांनी पाहणी केली. आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी 5 च्या दरम्यान पुयनी, आणि वाघी, सुगांव आदी भागाची आमदार कल्यानकर यांनी पाहणी केली. शिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकाची देखील पाहणी केली. मुसळधार पावसामुळे नांदेड उतरमधील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पाणी साचले होते. अनेक गावातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान देखील झाले. मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिले.