औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागातील तब्बल 55 लाख रुपयांच्या गैरव्यवाहार प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाने सामान्य प्रशासन विभागाकडे नुकतीच केल्याने कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे लेखा विभागाच्या पथकाने १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील लेखापरीक्षण केले यामध्ये जीएसटी कपातीसह इतर कपातीच्या ५५ लाख रुपये वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले