पिंपरी गणेशपुर येथील सहदेव बाणेकर व कलावती बाणेकर यांच्या शेतात जाणारा रस्ता प्रतिवादी शेतकर्याने बंद केला असल्याने, त्याबाबतीत तहसील कार्यालय मोर्शी येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. तहसील विभागाने तक्रारीची दखल घेऊन आज दिनांक 12 सप्टेंबरला दुपारी एक वाजता तलाठी जानराव काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून, वादी व प्रतिवादी शेतकऱ्यांमध्ये समेट घडवून आणला. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे