स्थानिक प्रश्नांवर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.याविषयी संताप व्यक्त करत दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदारांना जाब विचारला.अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही काही मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिकांनी मांडली होती.याबाबत आ.लवटे यांनी थेट तहसीलदार यांना काही दिवसापूर्वी फोन करुन समस्या सोडविण्याचे निर्देश दिले होते यावर तहसीलदार यांनी आ.लवटे यांची दिशाभूल केली.