ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी आजही अत्यंत बिकट परिस्थिती आहे. शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गाव अजूनही रस्त्यापासून वंचित आहे. गावातील कातकरी आदिवासी बांधव मरणा नंतरही मरण यातना सहन करत आहेत. कातकरी बांधवांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नदीच्या पाण्यातून वाट काढून पलीकडे जाऊन करावा लागतो. कातकरी आदिवासी बांधवांचा मृतदेह झाला असून त्याला खांद्यावर घेऊन नदीच्या पाण्यातून वाट कडून पलीकडे जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.