मालेगाव शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी Anc: आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मालेगाव शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मालेगावच्या अपर व जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुनावली गेली. आर्थिक गुन्हे शाखेकडून अटकेत असलेले शिक्षण विभागातील तिघे बडे अधिकारी आहेत. जिल्हा परिषद नाशिकचे शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.