दिनांक 21 ऑगस्ट रोजी देशाच्या उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना अकोला लोकसभा मतदारसंघाच्या वतीने शुभेच्छा देऊन खासदार अनुप धोत्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपचे युवा खासदार धोत्रे यांनी राधाकृष्णन यांना प्रचंड बहुमताने यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, माजी खासदार व तामिळनाडूचे माजी राज्यपाल म्हणून राधाकृष्णन यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे देशाला नवी दिशा मिळेल, असा आशावाद खासदार धोत्रे