काही दिवसापूर्वीच कल्याणच्या एका नामांकित हॉटेलचा निष्काळजीपणा समोर आला होता.ग्राहकाच्या जेवणात चक्क लोखंडाचा तुकडा आढळला होता.ही घटना ताजी असताना त्याच हॉटेलमध्ये पुन्हा फ्राईड राईस मध्ये चक्क झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला फ्राईड राईस पार्सल घरी घेऊन गेली आणि तिच्या मुली खात असताना त्यामध्ये झुरळ आढळले.याप्रकरणी महिलेने संताप व्यक्त करत प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे देखील सांगितले आहे. मात्र या घटनेमुळे ग्राहकामध्ये संतापाची लाट पसरली आहे.