मागील काही दिवसापूर्वी उल्हासनगर परिसरामध्ये दहशत माजवत तलवारीने दुकान आणि गाड्यांची तोडफोड केली होती तसेच एका महिलेवर हल्ला देखील एका गुंडाने केला होता आणि परिसरामध्ये दहशत माजवली होती. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची विठ्ठलवाडी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आणि सुमित कदम उर्फ लाल्या या आरोपीला ताब्यात घेऊन काल रविवारी त्याची दहशत वाजवलेल्या परिसरातून धिंड काढली. तसेच इतरांनी असा प्रकार केला तर अशीच अवस्था केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिल