एटापल्ली - तालूक्यातील अति दूर्गम अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त असलेल्या सूरजागड नेंडेर या गावातील एका ८० वर्षीय वृद्ध महिला आपल्या घरून नातेवाईकाला भेटण्याकरीता एकटीच नजीकचा गावाकडे जाताना रस्ता भरकटत फिरता फिरता आलापल्ली येथे पोहचली येथे चार दिवसापासून अनवानी फिरत असताना सामाजिक कार्यकर्तानी व्हाट्स एप ग्रूपवर वर तिची माहीती टाकत तिचा गावाचा शोध घेतला व आज दि.२४ आगस्ट रविवार रोजी दूपारी १२ वाजेचा सूमारास सूखरूप पणे तिला तिचा घरी पोहचवत कूटूंबाचा स्वाधिन करण्यात आले.