फुलंब्री तालुक्यातील राजनगाव ते पिरबावडा या शेत रस्त्याचे अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याचे दुरुस्ती तात्काळ करावी या मागणीसाठी सरपंच मंगेश साबळे यांनी पाण्यात बसून आंदोलन केले. या रस्त्यावरून सुमारे 22 विद्यार्थी दररोज शाळेत नियमित ये - जा करतात. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.