सेनगांव शहरातील रहिवासी असलेले विलास कापसे यांच्या निवासस्थानी चक्क ज्येष्ठा गौरी समोर रामायणातील सीता मातेचे जन्मापासून ते अग्निपरीक्षा पर्यंतचे देखावे सादर करण्यात आले असून या देखाव्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षात होत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ज्येष्ठा गौरी समोर अतिशय चांगल्या प्रकारचे देखावे सादर करण्यात आले असल्याने ज्येष्ठा गौरी बघण्यासाठी महिलांची गर्दी होत असून या देखावामुळे ज्येष्ठा गौरी कौतुकास पात्र ठरत आहेत.