नांदूर नाका येथे दोन युवकांवर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा प्रत्यक्ष सहभाग असून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची जखमी युवकांच्या कुटुंबीयांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.निमसे आणि धोत्रे या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या सोबत 20 ते 25 जणांनी राहुल धोत्रे व त्याचा मित्र अजय कुसाळकर यांना लोखंडी शस्त्राने,गजाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली.