औसा — एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम, संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे, संचालिका सौ. माधुरी बावगे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून करण्यात आले.