रेल्वेच्या शौचालयात प्रवाशी गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. आज ३० ऑगस्ट रोजी दुपारी रेल्वे स्थानक बल्लारपूर येथे खळबाजनक घटना उघडकीस आली. मुंबईहून येणारी नंदीग्राम एक्स्प्रेस क्रं ११००१ ही गाडी दुपारी सुमारे 1.30 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ०५ वर पोहचली होती. त्यात शौचालयात प्रवाशी गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आला. या गाडीची सी अँड डब्ल्यू विभागाने नेहमीप्रमाणे अंतर्गत तपासणी सुरू केली असता, कोच क्रमांक एस ३ मधील उजव्या बाजूच्या शौचालयाचे दार आतून बंद असल्याचे आढळले.