मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता पुन्हा एकदा वेग मिळाला आहे. 29 ऑगस्टपासून मुंबई येथे होणाऱ्या या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील मराठा बांधव आज मंगळवार, दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी बारा वाजता ट्रॅक्टरमधून मुंबईकडे निघाले आहेत. गावातील अनेक युवक, शेतकरी व महिलांनी एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.