शाळेत शिक्षक न आल्याने पालकांनी ठोकले शाळेला कुलूप वाशिमच्या जांभरूण महाली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शिक्षकच न आल्यानं पालकांनी संतप्त होत विद्यार्थ्यांना घरी जायला सांगून शाळेला चक्क कुलूप ठोकलय .पालकांनी दिलेल्या माहितीनुसार या गावात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र आज एकही शिक्षक शाळेत न आल्यानं बराच वेळ विद्यार्थी तसेच बसून होते. ही बाब पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाळेत धाव घेऊन विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितलं आणि शाळेच्