तुमसर तालुक्यातील माडगी येथे तुमसर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दि. 3 सप्टेंबर रोज बुधवारला रात्री 9 वाजताच्या सुमारास आरोपी विजय श्रीराम झंझाड यांच्या हॉटेलमधून विविध कंपनीचे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असा एकूण 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.