डोंबिवली परिसरातील कल्याण रोडवर पलाबा येथे बिर्याणी शॉप ला भीषण आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली.अचानक सकाळच्या वेळी बिर्याणी शॉप मध्ये आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि 30 ते 35 मिनिटानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु बिर्याणी शॉप आणि शॉप मधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आगीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.