मराठा आरक्षण मागणीसाठी गेली पाच दिवस झाले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आजे याला पाठिबा म्हणून आज दि.२१ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली.या बंदला धाराशिव जिल्ह्यासह धाराशिव शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला, यावेळी धाराशिव शहरातील व्यापारी उद्योजक यांनी आपले दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून रॅली काढली