कृष्णा–पंचगंगा नदीच्या पाण्याने कुरुंदवाड येथील गोठणपूर, शिकलगार वसाहत तसेच कोरवी गल्ली परिसरातील स्थलांतरित पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी महसूल विभाग आणि नगरपालिकेतर्फे कागदपत्रके घेतली जात आहेत.पूरग्रस्त कुटुंब प्रमुखांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आणि रेशनकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे यादी निहाय संकलित केली जात आहेत.या प्रक्रियेत नागरिकांना नगरपालिकेच्या पथकाकडे थेट कागदपत्रे जमा करावी लागत असून,आतापर्यंत दीडशेहून अधिक कुटुंबांनी आपली कागदपत्रे सादर केली आहेत.