भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख या दोन्ही आमदारांनी एकत्रित येऊन मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. दोन्ही देशमुख प्रथमच जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्याने त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजयकुमार देशमुख यांनी मोठा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात सोलापूरला आयटी पार्क करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.