शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण पोळा उद्या, शुक्रवार दि. 22ऑगस्ट रोजी हर्षोल्लासात साजरा केला जाणार आहे.त्याआधी परंपरेनुसार गुरुवारी (21 ऑगस्ट) शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची ‘खांदेमळण’ करून सणाची सुरुवात केली.शेतकऱ्यांनी बैलांना नदी-नाल्यांवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली. तूप व हळदीने मालिश करून त्यांना सजविण्यात आले.तसेच बैलांना ज्वारीचे फळ, वरण-भात, भरडा आदी खास जेवण देऊन “आज आवतन, उद्या जेवण” अशी पारंपरिक रीतदेखील पार पाडली.