तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महिला कंपनी वायुगळती झाली आहे. कंपनीत प्रक्रियेदरम्यान अचानक नायट्रोजन वायूची गळती झाली. वायुगळतीची बाधा झाल्यामुळे सहा कामगारांना उपचारासाठी बोईसर येथील शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापति, कमलेश यादव अशी मृतकांची नावे आहेत. रोहन शिंदे व निलेश हाढळ यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.