शहरातील सोनू चौक येथील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारीसाठीची वाहतूक पोलीस चौकी ही गुरुवारी दुपारच्या सुमारास हटवण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जयस्तंभ चौकापर्यंत मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे तसेच या मार्गावरील फळ विक्रेत्यांमुळे देखील वाहतूक कोंडी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या तर सोनू चौक येथे वाहतूक कोंडी होत असल्याने या वाहतूक कोंडीत रहदारीला अडथळा ठरणारा पोलीस चौकी देखिल हटवण्यात आले आहे.