दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 11:30 च्या दरम्यान किनवट तालुक्यातील कोठारी येथे फिर्यादी सिद्धार्थ निवृत्ती पाटील हे आपल्या घराला कुलूप गेले असता कुणीतरी अज्ञात चोराने दाराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटातील नगदी 15 हजार रुपये व 50 हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हे चोरून नेले होते, याप्रकरणी फिर्यादी सिद्धार्थ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किनवट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोउपनि कल्हाळे हे करत आहेत.