औसा -माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढलेला येवा लक्षात घेऊन पाण्याची पातळी पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने नियंत्रणात ठेवण्यासाठी निम्न तेरणा प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 8.15 वाजता एकूण 2 दरवाजे 20 सेंमी. ने उघडण्यात आले. सध्या धरणातून एकूण 4576 क्यूसेक्स (129.55 क्यूमेक्स) विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यात 8 दरवाजे प्रत्येकी 10 सेंमी. ने उघडले आहेत 2 दरवाजे प्रत्येकी 20 सेंमी. ने उघडे आहेत.