दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी 9 च्या दरम्यान कांडली ता. भोकर येथे, यातील मयत साईनाथ रामल्लु गंदमवाड, वय 40 वर्षे, व्यवसाय शेती रा. कांडली ता. भोकर जि. नांदेड यांनी शेतीच्या सततच्या नापिकीला व बँकेच्या कर्जाला कंटाळून विषारी औषध पिवून आत्महत्या केली. खबर देणार रजलराम चिंनन्ना गंदमवाड, वय 44 वर्षे, व्यवसाय शेती रा. कांडली यांनी दिलेल्या खबरीवरून भोकर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों राचलवार, हे करीत आहेत