माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नागरिक व शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ठोक्याने जागा घेऊन ठेवली असून, त्या जागेवरून निर्मित वीज महावितरणला एक लाख रुपये प्रति एकर दराने विकली जाणार आहे. मात्र, महावितरण हीच वीज ग्राहकांना दुप्पट भावाने विकणार आहे. त्यामुळे महागड्या वीज दरापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घर व शेतात स्वतंत्र सोलर पॅनल बसवावे, असे आवाहन त्यांनी आज दि २७ ऑगस्ट रोजी सांय ५ वाजता केले.