मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस...शेतातील उभे पिक झाले जमीनदोस्त ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान Anc- मालेगाव तालुक्यातील कळवाडी, देवघट, साकुर, चिंचगव्हाण, दापुरे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.मका, बाजरीसह शेतातील उभे पिके या पावसामुळे जमीनदोस्त झाले.तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले..या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्या सुचनेनुसार तहसीलदार, कृषी अधिकारी आदींच्या पथकाने भेट दिली.