दारव्हा येथील शासकीय विश्रामगृहात आज दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान झालेल्या मनसे पक्ष प्रवेश कार्यक्रमात दिग्रस येथील युवा नेते दिनेश सुकोडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेत प्रवेश केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा श्रीरामवार यांच्या हस्ते पक्ष प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली. सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून अनेकांना संकट काळात मदत केल्यामुळे दिनेश सुकोडे यांची ओळख जनसामान्यांमध्ये मजबूत आहे. यावेळी मनसेचे नेते अनिल हमदापुरे सह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.