लातूर शहरात आज दुपारी 2.30 वाजता भूगर्भातून आलेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावरदेखील नागरिक जमा झाले आहेत. या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे देण्यात आली असून, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रालाही खबर देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आवाजाची नेमकी कारणमीमांसा अद्याप निश्चित झालेली नाही, मात्र भूकंपीय यंत्रावर कोणतीही हालचाल नोंदवली गेली नाही. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन केले