माजी मंत्री तथा माजी आमदार यशोमती ठाकुर यांच्या मोझरी येथील निवास्थानी दरवर्षीप्रमाणे आज १ सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता यंदाही जेष्ठ गौरी पूजन मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न झाले. या पूजनावेळी संपूर्ण ठाकुर परिवार उपस्थित होता.परंपरेनुसार पारंपरिक विधीपूर्वक गौरीमातेची प्रतिष्ठापना व पूजन करण्यात आले. या वेळी कुटुंबीयांनी आई गौरीच्या चरणी सुख, शांती व समृद्धीची प्रार्थना केली. पूजनामुळे संपूर्ण निवासस्थानात मंगलमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते...