आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलंय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. या कारवाईत आरोपींनी गुन्हा करतांना वापरलेले 31 हजार रुपये किंमतीचे 3 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. मध्यप्रदेश राज्यातील तीन संशयित डिझेल चोर जालन्याच्या लक्ष्मीकांत नगर येथे उभे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारव