उल्हासनगर मधील बालसुधारगृहातील सहा अल्पवयीन मुली पंधरा दिवसांपूर्वी पळून गेल्या होत्या. दुपारच्या वेळी कर्मचारी जेवायला गेला असता त्याची संधी साधून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला.सहा मुलींपैकी चार मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. घरच्यांची आठवण येत असल्यामुळे पळून गेल्याचा जबाब मुलींनी दिला.मात्र बालसुधारक गृहातील सुरक्षारक्षक,संरक्षण भिंत,सीसीटीव्हीची यंत्रणा वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.