तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांवर यंदा सोयाबीनवर आलेल्या रोगराईमुळे मोठे संकट कोसळले आहे. केळझर, महाबळा, कोटंबा, धपकी, वडगाव (जंगली), चारमंडळ आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकांना ‘एलो मोझ्याक’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सेलू तालुका काँग्रेस कमिटी व ग्रामपंचायत महाबळा यांच्या वतीने ता. 9 मंगळवारला दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात धडकदेत नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनातून केली.