गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव टि पॉईंट ते जांभुलखेडा कोरची या मार्गावर रस्त्याचे खोदकाम केले आहे. या ठिकाणी पावसामुळे चिखलाचे थैमान झाले आहे. अश्यातच सुरजागड महाराष्ट्र वरून रायपूर छत्तीसगड ला जाणारे तसेच जड वाहतूक करणारे चार ट्रक या ठिकाणी चिखलात फसल्यामुळे व मागे समोर जवळपास 10 ते 15 ट्रक रस्त्यावर उभे आहेत. यामुळे वाहतूक दोन दिवसांपासून ठप्प पडली आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.