मिरजेतील यंदाचा गणेशोत्सव हा डीजे मुक्त आणि नशा मुक्त साजरा केला जावा असं आवाहन पोलिसांनी अनेक सामाजिक उपक्रम प्रबोधन आणि आवाहने तसेच गणेश मंडळाच्या अनेक बैठका घेऊन केलं होतं. त्याला मिरजेतील अनेक मंडळाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा पहावयास मिळतं आहे. शनिवारी मिरजेतील मोठमोठे गणेश मंडळे आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत. या मंडळाकडून पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पारंपारिक वाद्याच्या निनादांमध्ये विसर्जन मिरवणूक काढल्याचं पहावयास मिळतं आहे .तर डॉल्बीला फाटा देत अनेक मंडळांनी झा