श्री गणेशाचे विसर्जन बाजार समिती आवार सेलू येथील सार्वजनिक विहिरीत करण्यात येणार असून, त्या दृष्टीने नगरपालिकेने बॅरिकेटिंग, सीसीटीव्ही तसेच पोहणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सेलू शहरातील श्री गणेश विसर्जनाच्या मुख्यमार्गाची आज गुरुवार 4 सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू दिपक कुमार वाघमारे, मुख्याधिकारी नगरपरिषद कदम,नायब तहसीलदार विजयकुमार मोरे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.