भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील अमोल गाढवे हे दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता दरम्यान आरोचे काम करून मोटर सायकलने घरी परत जात असताना नागपुरच्या दिशेने भंडारा कडे जाणारा आरोपी ट्रक क्रमांक सीजी 13 एए 5830 चा चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन दारूच्या नसेत हयगईने व निष्काळीपणे चालवून अमोल गाढवे यांना धडक दिली. याप्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे आरोपी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनबंधू हे करीत आहेत.