डोंबिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहे तर त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे खड्ड्यांच्या विरोधात मनसेने आक्रमक होत अनोख्या आंदोलन केले आहे. डोंबिवली परिसरामध्ये सर्वेश हॉल समोर खड्ड्यात बसून टाळ मृदंग वाजवत खड्ड्यांची आरती करून आंदोलन केले आणि प्रशासनाला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी देण्याची मागणी केली. तसेच सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा निषेध केला.