कोथळी बु येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; ३९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.. बार्शीटाकळी पोलीस स्टेशन बार्शीटाकळी हद्दीतील कोथळी बु येथे आज पंचांसमक्ष पोलिसांनी छापा टाकून अजय भीमराव वरठे (वय ४०) रा. कोथळी बु याच्याकडून २१० लिटर सडवा मोहम, ४० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ३९,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ ई, क, ड, फ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत.